रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 7 नोव्हेंबर 2022 (23:37 IST)

मुंबई -गोवा हायवेवर अपघातात 4 जणांचा दुर्देवी मृत्यू

accident
मुंबई -गोवा एक्सप्रेस हायवेवर काळाने एका रिक्षावर झडप घातली त्यात 3 विद्यार्थिनी आणि रिक्षा चालकाचा अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना पोलादपूरजवळ कशेडी घाट रस्त्यावर चोळवी गावाच्या हद्दीत घडली आहे. या विद्यार्थिनी परीक्षा देऊन परत येत असताना चोळई गावाच्या वळणावर वाळूने भरलेला डम्पर रिक्षावर उलटला त्यात चौघांचा मृत्यू झाला. हलिमा पोतेरे (23), आशिया बडूर(20), नाजनीन करबेलकर(23), आणि रिक्षा चालक उमर बडूर अशी मृत्युमुखींची नावे आहेत. या माणगाव तालुक्यात गोरेगाव परिसरातील विद्यार्थिनी असून खेडला परीक्षेला गेल्या होत्या. परीक्षा देऊन परत येतांना त्यांच्या रिक्षाचा अपघात झाला आणि त्यात रिक्षा चालकासह तिघी मृत्युमुखी झाल्या. अपघातात दोन्ही वाहने क्रेनच्या साहाय्याने वेगळी केली. पोलिसांनी अपघाताची नोंद करून मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहे.  

Edited by - Priya Dixit