शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 1 ऑक्टोबर 2022 (07:58 IST)

कलानी यांच्या भावाला ४१ लाखाचा गंडा

पप्पु कलानी यांचे भाऊ नारायण कलानी यांनी सीमा हॉटेल, फर्निचर दुकान यांचे टॅक्स व जीएसटी भरण्यासाठी ओळखीच्या कृष्णकांत फुलपारधी याला कॅनेरा व ऍक्सेस बँकेचे तीन वेगवेगळ्या रक्कमेचे चेक दिले होते. मात्र फुलपाराधी याने हॉटेलचा टॅक्स व जीएसटी ना भरता मित्रांच्या बँक खात्यात चेक वठवुन ४० लाख ९७ हजार ३८५ रुपयांची फसवणूक कलानी यांची केल्या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
 
उल्हासनगर कॅम्प नं-२ खेमानी परिसरात माजी आमदार पप्पु कलानी यांचे मोठे भाऊ नारायण कलानी कुटुंबासह राहतात. त्यांनी सीमा हॉटेल व फर्निचर दुकानाचे टॅक्स व जीएसटी भरण्यासाठी कॅनेरा व एक्सेस बँकेचे तीन धनादेश कृष्णकांत फुलपारथी याला ३ ऑक्टोबर २०२० ते १८ ऑगस्ट २०२२ दरम्यान दिले. फुलपारथी याने ४० लाख ९७ हजार ३८५ रुपयांचे सीमा हॉटेल व फर्निचर हॉटेल यांचे टॅक्स व जीएसटी टॅक्स न भरता, चेक मित्राच्या बँक खात्यात वठवून घेऊन कलानी यांची फसवणूक केली.