मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 22 फेब्रुवारी 2022 (09:29 IST)

कुटुंबातील 5 जणांनी एकत्रच घेतलं विष

धुळे जिल्ह्यातील मोहाडी परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने या घटनेतून सर्व जण थोडक्यात बचावले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कौटुंबिक कलहातून अवधान परिसरात ही घटना घडली आहे. भरत पारधी हे आपली पत्नी आणि मुलांसह या परिसरात राहतात. सोमवारी संध्याकाळी अचानक भरत पारधी यांच्यास कुटुंबातील सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पत्नी सविता, मुलगी जयश्री, मुलं गणेश, गोपाळ अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांची नाव आहे. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पाचही जणांचे प्राण वाचले आहे.
 
मात्र, भरत पारधी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. भरत आणि सविता यांनी प्रेमविवाह केला होता परंतु या नात्याला कुटुंबीयांचा विरोध असल्यामुळे होणाऱ्या कलहातून या पाचही जणांनी विष प्राशन केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्यावर हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.