सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 15 मे 2022 (16:13 IST)

पुलावरुन कार कोसळून झालेल्या अपघातात 6 महिन्याच्या चिमुकल्यासह 5 गंभीर

आर्वी येथून चंद्रपूर कडे जात असताना भरधाव वेगाने धावणाऱ्या कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार पुलावरून खाली कोसळून झालेल्या अपघातात 6  महिन्याच्या चिमुकल्यासह 5 जण गंभीर जखमी झाल्याची घटना 13 मे रोजी मध्यरात्री वाढोवा मार्गावर सावळापूर शिवारात घडली आहे.
 
 चंद्रपूर येथील राहणारे राडे कुटुंबीय आर्वी येथून एका कार्यक्रमातून परत चंद्रपूर येथे जात असता कार चालकाचा वाहनावरून ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या अपघातात त्यांची कार पुलावरून खाली कोसळली. त्यात सुनील हरिराम राडे(45), विवेक बुटले(65), आर्यन सुनील राडे(6 महिने), परमेश्वरी सुनील राडे(45),आणि रिया विवेक बुटले(25)हे जखमी झाले आहे. अपघाताची  माहिती मिळतातच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत नागरिकांच्या मदतीने जखमींना सेवाग्रामातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.  पोलीस पुढील तपास करत आहे.