सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (14:10 IST)

7 वर्षीय मुलाचा नरबळी, मृतदेहावर हळद-कुंकू टाकलेलं होतं

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्तयातील वारणा कापशी येथील सात वर्षीय आरव केदार केसरे याचा मृतदेह आज पहाटे त्याच्या घराजवळ आढळला. हा नरबळी प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मृतदेहावर गुलाल, कुंकू टाकले होते. 
 
नेमकं काय घडलं?
रविवारी सायंकाळी आरव घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. त्यामुळे पालकांनी त्याच्या अपहरणाची तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. वेगवेगळ्या ठिकाणी आरवची शोधाशोध केली गेली. मात्र आज सकाळी सहा वाजता आरवचा मृतदेह त्याच्या घराच्या पाठीमागे सापडला. त्यांच्या अंगावर गुलाल, हळदी-कुंकू टाकण्यात आलं होतं. डोक्याला, पाठीवर जखमा होत्या. त्यामूळे हा प्रकार नरबळी असल्याची चर्चा होती. जवळच्या नातेवाईकानेच हे कृत्य केले असावे, असा संशयही व्यक्त होत होता. या चिमुकल्याचा बळी घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
 
दरम्यान अरावचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालय कोल्हापूर येथे पाठवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्युचे कारण स्पष्ट होईल.
 

या घटनेचा ग्रामस्थांनी निषेध केला. पोलिसांचा तपास सुरु आहे.