मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2019 (16:31 IST)

डॉक्टरांनी दिले चुकीच्या पद्धतीने इंजेक्‍शन, मुलगी दगावली

पुण्यातील बावधानमध्ये चुकीच्या पद्धतीने इंजेक्‍शन दिल्याने एका तेरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. याप्रकरणी डॉक्‍टरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रज्ञा अरुण बोरुडे (१३) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे.  डॉ. जाधव (रा. रामकृष्ण क्‍लिनिक, रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थनगर, बावधन, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्‍टरचे नाव आहे.  
 
वरिष्ठ पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ सप्टेंबर २०१७ रोजी प्रज्ञाला थंडी ताप आल्याने तिला बावधन येथील रामकृष्ण क्‍लिनिकमध्ये उपचारासाठी आणले. तपासणी केल्यानंतर डॉ. जाधव याने प्रज्ञाच्या उजव्या कमरेवर एक इंजेक्‍शन दिले आणि काही गोळ्या देऊन घरी सोडले. थोड्या वेळेतच प्रज्ञाला इंजेक्‍शन दिलेल्या जागी आणि उजव्या मांडीवर, कमरेवर आणि पाठीवर काळे चट्टे व फोड आले. त्यामुळे तिला त्वरित उपचारासाठी पुणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, काही वेळेत प्रज्ञाची प्रकृती आणखी खालावली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला.