शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 जानेवारी 2019 (17:18 IST)

गुटखा खाऊन दूध पिल्यामुळे तरूणीचा मृत्यू

नंदुरबार शहरात गुटखा खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यामुळे एका तरूणीला विषबाधा झाली असून यामध्येच या तरूणीचा मृत्‍यू झाला आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील मुजावर मोहल्ला एकता चौकी येथे राहणारी निषाद अंजूम सलीम सैय्यद या (27) तरुणीने 5 दिवसांपूर्वी गुटखा खाल्ल्यावर त्‍यावर लगेच दूध पिले होते. गुटख्यावर दूध पिल्‍याने तिला विषबाधा झाली आणि त्यामुळे तिची प्रकृती अत्यवस्थ होताच, तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, उपचार चालू असताना तिचा मृत्यू झाला.