गोवंडी परिसरातील झोपडपट्टीला भीषण आग, अनेक घरे जळून खाक
मुंबईतील गोवंडी -शिवाजी नगर आणि आदर्श नगर परिसरात झोपडपट्टीला शनिवारी पहाटेच्या सुमारास आग लागली. आगीन रौद्र रूप धारण करत परिसरातील अनेक घरे जळून खाक केली. या आगीमुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले असून संसार उपयोगी सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहे.
आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले आहे.सुदैवाने या आगीत कोणती जन हानी झाली नाही. मात्र स्थानिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या भागात नागरिकांची मोठी वर्दळ आहे.
आज सकाळी पहाटे 3:30 वाजेच्या सुमारास काही झोपड्यांना आग लागली. आग लागल्याचे समजल्यावर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड सुरु केला. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण करत परिसरातील इतर घरांना विळखा घातला आणि इतर घरे देखील जळून खाक झाले.
स्थानिकांनी आपला जीव वाचवण्यासाठी मोकळ्या जागेत धाव घेतली. आपली घरे आगीच्या भक्षस्थानी होताना त्यांचे अश्रू अनावर झाले.
अग्निशमन दलाने माहिती मिळतातच तातडीनं घटनास्थळी धाव घेत पोलिसांसह पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला .
Edited by - Priya Dixit