गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 7 जून 2023 (08:24 IST)

मुंबई वसतिगृहाच्या एका खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला

death
मरीन ड्राईव्ह येथील एका वसतिगृहाच्या एका खोलीत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास समोर आली. बलात्कार करून तरुणीची हत्या केल्याचा संशय वर्तविण्यात येत असून पोलीस अधिक तपास करत आहे. तरुणी मूळची अकोला येथील असून तिचे वडील पत्रकार आहे. तिच्या वडिलांना याबाबत माहिती देण्यात आली असून ते मुंबईकडे येण्यास निघाले आहे.
 
मरीन ड्राईव्ह सावित्रीबाई फुले वसतिगृहात ही धक्कादायक घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारास ही घटना उजेडात आल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत ती विवस्त्र अवस्थेत आढळून आली.  
 
तरुणीचा मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठविण्यात आला आहे.  तरुणीवर बलात्कार करून तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. याबाबत, पोलीस अधिक तपास करत आहे. सुरक्षा रक्षक सकाळपासून गायब असल्याने एक पथक सुरक्षा रक्षकाचा शोध घेत आहे.
 
सुरक्षा रक्षकाची आत्महत्या?
पोलिसांना रेल्वे ट्रॅकवर एक मृतदेह मिळून आला आहे. आरोपी नाव ओमप्रकाश कनोजिया जवळपास १५ वर्षांहुन अधिक काळ तिथे वॉचमन म्हणून काम करत होता. संशयित आरोपी असलेल्या सुरक्षा रक्षकाने सकाळी ६ वाजता चर्नीरोड ते ग्रँटरोड स्थानका दरम्यान लोकल समोर येत आत्महत्या केली.

Edited By- Ratnadeep Ranshoor