गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (09:25 IST)

माथेरानमध्ये महिलेचा शिर कापलेला निर्वस्त्र मृतदेह आढळला

माथेरानमधील इंदिरानगर येथे एका घरामध्ये चालवल्या जाणाऱ्या लॉजिंगमध्ये महिलेचा शिर कापलेला मृतदेह आढळून आला. निर्वस्त्र असलेल्या या मृतदेहासोबत कोणतीही वस्तू आणि ओळखपत्र नव्हते. 
 
माथेरानमधील इंदिरानगर परिसरात एका महिला पर्यटकाची गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचे शिर हत्या करण्यार्‍याने कापून नेले.
 
शनिवारी एक जोडपे सायंकाळी माथेरानमधील इंदिरानगर परिसरात राहण्यासाठी आले होते. लॉजच्या मालकाने त्यांनी नावे नोंदवून खोली भाड्याने दिली होती. रविवारी सकाळी जेव्हा नेहमी प्रमाणे या पर्यटकांना पाहण्यासाठी गेले असता महिलेचे धड पलंगाखाली निर्वस्त्र अवस्थेत आढळून आले असून आरोपीने मृत महिलेचे शिर सोबत घेऊन गेल्याने तिची ओळख प‍टविण्यासाठी पोलिसांसबोर अनेक अडचणी येत आहेत.
 
याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे. रायगड पोलीस गुन्हे अन्वेषण शाखा व माथेरान पोलीस प्रकरणाचा कसून तपास करीत आहेत.
 
लॉजचा केअर टेकर सकाळी चहा -नाश्ता विचारण्यासाठी गेला असता त्यास महिलेचा विवस्त्र अवस्थेतील शीर नसलेला मृतदेह दिसला. नंतर पोलिसांना याबाबत कळविण्यात आले. रायगड पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फोटो प्रसारीत केले असून त्यांना ओळखणाऱ्यांनी रायगड पोलिसांना संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
 
या महिलेने रूममध्ये कोणतेही सामान सोबत आणलेले नव्हते.