शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 8 जानेवारी 2025 (21:00 IST)

अकोल्यात मॉर्निग वॉकला गेलेल्या महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या

murder
अकोला येथे जुने शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील न्यू हिंगणा कॉम्प्लेक्समध्ये शेजारी राहणाऱ्या एका महिलेसोबत गेलेल्या महिलेचा एका तरुणाने धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थल गाठून आरोपींचा शोध सुरु केला.

सविता ताथोड असे या मयत महिलेचे नाव असून त्या बुधवारी सकाळी शेजारच्या महिलेसोबत मॉर्निग वॉक गेल्या असता सविताच्या शेजारी राहणारा एक तरुण तिच्या जवळ आला आणि तिच्याशी वाद घालू लागला.काही वेळातच वाद वाढला आणि तरुणाने सविता यांच्या मानेवार आणि पोटावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. सोबतच्या महिलेने तरुणाला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र तरुणाने महिलेला ढकलून दिल.  

तरुणाने केलेल्या वार मुळे सविता या जमिनीवर कोसळल्या. घटनेची माहिती लोकांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांना बोलावून तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरनी त्यांना मृत घोषित केले. 

सविताच्या कुटुम्बियांच्या तक्रारीवरून आरोपी तरुणाच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. सविता यांच्या घराचा शेजारी तरुण रहायचा. त्यांच्यामध्ये नेहमी वाद होत असायचे त्या वादामुळे आरोपीने सविताचा निर्घृण खून केला. 
 Edited By - Priya Dixit