सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2023 (19:57 IST)

Accident : मुंबई- पुणे हायवेवर अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू

accident
सणासुदीच्या वेळी लोणावळा - खंडाळा दरम्यान मुंबई पुणे हायवेवर भरधाव कंटेनरची धडक बसून दोन दुचाकींचा अपघात झाला. या अपघातात तिघांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एक महिला एक पुरुष आणि एका मुलीचा मृत्यू झाला. फरियाज हॉटेल जवळ भरधाव कंटेनरने एका दुचाकीला जबर धडक दिली .कंटेनरच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावर फरियाज हॉटेल जवळ वळणावर भरधाव कंटेनर ने दोन दुचाकींना धडक दिली या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर तिघे जखमी झाले  या घटनास्थळी उतार आणि वळणावर अतिवेगाने वाहन चालवण्यामुळे कंटेनरच्या चालकाचे वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला 
 
अपघाताची माहिती मिळतातच लोणावळा पोलीस आणि आयआरबी कंपनीचे कर्मचारी देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केले पोलीस या अपघातातच तपास करत आहे .



Edited by - Priya Dixit