रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नोकरीत स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देणार : अजित पवार

सत्तेत आल्यास नोकरीत स्थानिकांना 75 टक्के आरक्षण देणार असून, त्यासाठी कायदा करणार असल्याचं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी  सांगितलं आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सोलापूर दौऱ्यावर आहेत. विधानसभेसाठी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेत आहेत.
 
विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीसोबतजाण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा प्रयत्न आहे. वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी समंजस भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी आघाडीबाबत काहीही वक्तव्य केले असले तरी आम्ही ते दुखावतील असे उत्तर देणार नाही. पण समविचारी पक्षांनी एकत्र यावे, असा आमचा प्रयत्न राहणार आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन झाले, अन्यथा सोलापूरचा निकाल वेगळा असता, असेही त्यांनी सांगितले.