बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (15:38 IST)

महाविकास आघाडीतला मुंडकं खाणारा डायनासॉर” अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्याला अजित पवारांच उत्तर

ajit pawar
सरकार अस्तित्वात आल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण चालू आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी दोन्ही बाजूंकडून सोडली जात नाही. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी बीडमध्ये एका कार्यक्रमात बोलताना महाविकास आघाडीवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या टीकेवर आज अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. तसेच, वेदान्त-फॉक्सकॉन प्रकल्पावरूनही अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं.
 
“महाविकास आघाडीतला मुंडकं खाणारा डायनासॉर”
अब्दुल सत्तार यांनी महाविकास आघाडीत मुंडकं खाणारा डायनासॉर आहे, असं म्हणत सूचक शब्दांत टीका केली होती. “आमच्या नेत्याला आम्ही बोललो की शिवसेना वाचवायची तर तुम्हाला पुढाकार घ्यावाच लागेल. महाविकास आघाडीमध्ये मुंडकी खाणारा डायनासॉर आहे”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यांचा रोख अजित पवारांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे. यासंदर्भात आज प्रसारमाध्यमांनी पुण्यात अजित पवारांना विचारणा केली असता त्यांनी त्यावरून परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे.
 
“असल्या फालतू टीकेला मी महत्त्व देत नाही.आज बेरोजगारी, महागाईचा प्रश्न आहे. त्याला महत्त्व न देता, त्या विषयांवर चर्चा न होण्यासाठी अशी वक्तव्य केली जातात. बेरोजगारी वाढली, वेदान्तसारखा प्रकल्प गेला.दोन लाख तरुणांचा रोजगार गेला. त्याविषयी त्यांनी बोलावं. इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, असं माझं सत्ताधाऱ्यांना आवाहन आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
 
Edited By - Ratandeep Ranshoor