मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 ऑगस्ट 2022 (21:09 IST)

अजित पवार म्हणाले आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?

ajit pawar
निधीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बोलत असताना सत्ताधारी बाकावरील काही आमदारांनी अडथळा आणल्यानंतर अजित पवार चांगलेच संतापलेले दिसले. यावेळी त्यांनी “अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?”, असा सवाल केला.
 
अजित पवार म्हणाले, “देवेंद्रजी मला तुम्हाला स्पष्ट सांगायचं आहे की आपण मनाचा मोठेपणा दाखवा. पाठीमागच्या काळात देखील २५-१५ चा निधी देण्याची कल्पना या नेत्यांच्या सुपिक डोक्यातून आली होती. २५-१५ आणि ठोक तरतूद असे निर्णय घेण्यात आले. त्याचा वापर मीदेखील मोठ्या प्रमाणात करून घेतला. त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. २५-१५ चा निधी देताना आम्ही महाविकासआघाडीमधील लोकांना पाच कोटीचा निधी दिला हे मी मान्य करतो. परंतु त्याचवेळी आम्ही तुमच्याकडून याद्या घेऊन तुमच्याही आमदारांना दोन दोन कोटी रुपये दिले.”
 
यानंतर सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी गोंधळ केला. यानंतर अजित पवार म्हणाले, “एक मिनिट, मघाशीच सांगितलं आहे की तुम्हाला जे बोलायचं आहे ते नंतर उठून बोला.” यानंतरही सत्ताधारी पक्षातून एक अजित पवारांच्या भाषणात अडथळा आणला गेला. यावर पवार संतापले आणि “अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?” असा सवाल केला.