गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 नोव्हेंबर 2017 (10:16 IST)

टेक्सास : चर्चमध्ये दहशतवादी हल्ल्या, 26 ठार

अमेरिकेतील टेक्सासमधील एका चर्चवर दहशतवादी हल्ल्या झाला आहे. चर्चमध्ये प्रार्थना सुरु असताना, बंदुकधारी हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात 26 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सदरलॅण्ड स्प्रिंग्जच्या विल्सन कौंटी परिसरातील फर्स्ट बाप्टिस्ट चर्चवर हल्ला झाला. हल्लेखोर चर्चमध्ये घुसला आणि त्याने गोळीबार सुरु केला. एकाच आठवड्यातील हा दुसरा दहशतवादी हल्ला आहे.हल्लेखोरालाही कंठस्नान घातल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हल्ल्यातील मृतांमध्ये पाच ते 72 वर्षांपर्यंत नागरिकांचा समावेश आहे. सुमारे 20 जण जखमी झाल्याचं प्रशासनातर्फे सांगण्यात आलं आहे. संशयित हल्लेखोर एक श्वेत तरुण असून त्याचं वय 20 ते 30 वर्षांदरम्यान आहे. हल्लेखोर काळ्या कपड्यांमध्ये होता, अशी माहितीही प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.