गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 1 फेब्रुवारी 2022 (20:49 IST)

हिदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांनी एकत्रित जमण्याचे आवाहन करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल

ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक हा सध्या पोलिसांच्या कोठडीत आहे. दरम्यान  हिदुस्थानी भाऊच्या सुटकेसाठी मुलांनी एकत्रित जमण्याचे आवाहन करणारी एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये मुलींनी जास्तीत जास्त प्रमाणात जमण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अमान नावाच्या मुलाच्या नावे ही क्लिप सध्या व्हायरल होतेय. काय म्हटलंय क्लिपमध्ये ?
 
मी अमान बोलतोय ग्रुपचा अॅडमिन. मी वांद्र्यात आलोय. इथे मी चौकशी केली वकिलांकडे इथे भाऊ नाहीत. भाऊना निघून अर्धा ते पाऊण तास झालाय. आता भाऊ धारावीत पोलीस कोठडीत आहेत. जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर जास्तीत जास्त संख्येने धारावीत या. आम्ही पण धारावीत जात आहोत. सर्वात जास्त आम्हाला मुलींची गरज आहे. मुली जास्त असतील तर पोलीस मारणार नाहीत. तेथे मीडिया पण आहे. आपली मैत्रीण, आपल्या बहिणी सर्वांना घेऊन या. जास्तीत जास्त विद्यार्थांना घेऊन या. कृपया सपोर्ट करा. लवकरात लवकर पोहचा, असे आवाहन या कथित ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आले आहे.