शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 19 ऑगस्ट 2023 (14:38 IST)

Aurangabad: चार वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

rape
औरंगाबादच्या वाळूज भागात मंदिरातून घराकडे निघालेल्या एका चार वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना वाळूज जवळ पंढरपूर येथे 17 ऑगस्ट गुरुवारी रोजी रात्री घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. 

सदर घटना वाळूजच्या पंढरपूर येथे गुरुवारी संध्याकाळी  7 वाजेच्या सुमारास घडली आहे. पीडित मुलीचे घर पंढरपूरच्या एका मंदिरामागे आहे. दररोज संध्याकाळी या मंदिरात हरिपाठ असतो. त्यामुळे दररोज प्रमाणे चिमुकली हरिपाठ सुरु झाल्यावर मंदिरात गेली होती. तिची आई घरातच होती. मंदिरात गेल्यावर चिमुकली गोंगाट करू लागल्यामुळे तिच्या बहिणीने तिला घरी जाण्यास सांगितले आणि ती एकटीच मंदिराच्या बाहेर पडून घरी जात असताना आरोपी कंपनीतून घरी जात असताना अंधाराचा फायदा उचलून मुलीला उचलून नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. संभाजी धवारे असे आरोपीचे नाव असून तो एका कंपनीत सुरक्षा रक्षक आहे.

घरी आल्यावर चिमुकली वेदनेने कळवळत होती. तिला विचारल्यावर तिने घडलेले सांगितले. घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबियांना धक्काच बसला. त्यांनी तातडीनं पोलिसांत  तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला शोधण्यासाठी पथके नेमली आणि आरोपीचा शोध लावून त्याला अटक केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.  
 
 Edited by - Priya Dixit