गुरूवार, 16 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 12 डिसेंबर 2019 (13:08 IST)

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय काल मंत्रिमंडळाने घेतला. गेल्या भाजप-युती सरकारमध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव समृद्धी महामार्गाला द्यावं असा विचार सुरू होता. मात्र आता नव्या सरकारने नागपूर-मुंबई यांना जोडणाऱ्या या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
 
याबाबत बोलताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "समृद्धी महामार्ग हा राज्य आणि देशासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यावं अशी मंत्रिमंडळातील सर्वांची इच्छा होती. ती मागणी पूर्ण झाली असून आता लवकरच कार्यवाही पूर्ण होईल."