रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : मंगळवार, 8 नोव्हेंबर 2022 (14:28 IST)

बाळासाहेब ठाकरे यांच्या जेष्ठ सून जयश्री कालेलकर – ठाकरे यांचे निधन

death
बाळासाहेब ठाकरे यांच्या जेष्ठ सून जयश्री कालेलकर – ठाकरे यांचे  निधन  झाले आहे. जयश्री या जयदेव ठाकरे यांच्या पहिली पत्नी होत्या. जयश्री या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मुंबईतील टाटा रुग्णालयात जयश्री यांच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान जयश्री यांना टाटा रुग्णलयातून घरी आणण्यात आले होते. पण रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज सकाळी 7 वाजता ठाकरे यांचे निधन झाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor