1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 जानेवारी 2020 (12:51 IST)

भारत बंद: रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

सीएए आणि एनआरसी विरोधात भारत बंदची हाक देणाऱ्या बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वेच्या कांजूरमार्ग स्थानकात रेल रोको केला. या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी वाहतूक सुमारे 20 मिनिटे उशिराने धावत आहे. 
 
बहुजन क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे रुळांवर उतरत एसएमटीकडे जाणारी मार्गावरील लोकल रोखून धरली. हा रेल रोको अर्धातास सुरु होता. 
या रेल रोकोमुळे मध्य रेल्वेच्या स्थानकांवर मोठी गर्दी उसळली आहे.
 
नंतर घटना संबंधी माहिती कळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रेल्वे रुळावर उतरलेल्या बहुजन क्रांती मोर्चाच्या आंदोलकांना दूर केले. नंतर मध्य रेल्वेची धीम्या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.
 
आज संपूर्ण भारतात नागरिकत्व विधेयक आणि एनआरसीविरोधात विविध संघटनांनी बंदची हाक दिली आहे.