मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (20:38 IST)

भुसे यांच्या वाहनाला पिकअप वाहनाचा कट, गोवंश वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्याच वाहनाला एका पिकअप वाहनाने कट मारत पळण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्याने वाहनचालकासह मंत्री भुसेही अचंबित झाले. त्यानंतर भुसे यांनी त्या वाहनाचा पाठलाग करण्याचे वाहनचालकास सांगितले. अखेर त्या वाहनचालकाचा पाठलाग करण्यात आला.
 
त्या पिक अप वाहनाला रस्त्यावरच पकडले. त्यानंतर अतिशय़ धक्कादायक बाब समोर आली. त्या पिकअप वाहनातून अवैधरीत्या गोवंश वाहतूक केली जात असल्याचे निष्पन्न झाले. ही बाब बेकायदेशीर असल्याचे लक्षात येताच मंत्री भुसे यांनी हे वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे हे  ग्रामीण भागाच्या दौऱ्यावर होते. त्याचवेळी हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेमुळे अवैध गोवंश वाहतूकीचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आली आहे. याबाबतचा व्हिडिओ समाज माध्यमातून व्हायरल झाला आहे. 
 
Edited By-Ratnadeep Ranshoor