शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (16:16 IST)

मंत्रालयात कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक्स हजेरी बंद

कोरोनासोबत ओमायक्रोन या नव्या उत्परीवर्तीत विषाणूचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याने मंत्रालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक्स हजेरी बंद करण्यात आली आहे.राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती दररोज बायोमेट्रिक्स प्रणालीवर करण्यात येते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्यातच मंत्रालयातील काही कर्मचारी आणि अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कोरोना संसर्गावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून येत्या ३१ जानेवारीपर्यंत बायोमेट्रिक्स हजेरी बंद करण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे.दरम्यान, येत्या काळात मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय भवनात बायोमेट्रिक्स मशिन्सची संख्या वाढवण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सध्या बायोमेट्रिक्स मशिन्सची संख्या कमी आहे. त्यामुळे हजेरी लावण्यासाठी कर्मचाऱ्यांची गर्दी होते. त्यामुळे येत्या १५ दिवसात आखणी नवीन मशिन्स बसवाव्यात, असे सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशात म्हटले आहे.