शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (08:22 IST)

याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय: भातखळकर

"राज ठाकरे यांचा आरोप धादांत खोटा आणि असत्य आहे. यापूर्वीही त्यांनी असे आरोप केले, परंतु मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. २००९ च्या गोष्टीचा संदर्भ त्यांना २०२१ ला द्यावासा वाटतोय याचा अर्थ माझं राजकीय वजन भरपूर वाढलेलं दिसतंय," असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला लगावला आहे."गौप्यस्फोट करण्याकरता माझा असा वापर करणं राज ठाकरेंसारख्या मोठ्या नेत्याला शोभत नाही. मी भाजपमध्ये होतो, आहे आणि आयुष्यभर राहीन. माझ्या दृष्टीनं पक्ष सोडणं म्हणजे आईचा त्याग करण्यासारखं आहे. हे मी त्यावेळीही सांगितलं होतं आणि त्याचा पुनरूच्चार मी आताही करतोय," असं ते म्हणाले. 
 
याआधी भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून तिकीट मागितलं होतं, असा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला एका वेबिनारमध्ये बोलताना केला.