गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 फेब्रुवारी 2019 (08:57 IST)

अतिक्रमण हटवत नाही म्हणून भाजपा कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

ऊर्जामंत्री बावनकुळेंच्या सभेतच यांच्या समक्षच धक्कादायक प्रकार घडला आहे. शासकीय जागेवरचे अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीसाठी भाजपाचेच माजी नगरसेवक आणि माळी समाजाचे नेते अरुण भेदे वारंवार निवेदन देत होते. या मागणीसाठी त्यांनी आंदोलनही केले होते. पण त्यापैकी कशाचाच उपयोग झाला नाही. पाठपुरावा करूनही भाजपा सरकार आणि मंत्री दखलच घेत नसल्यामुळे त्यांनी  पालकमंत्री बावनकुळे यांच्या समोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.