मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 10 डिसेंबर 2024 (18:17 IST)

मीरा रोड हिंसाचार प्रकरणी14 आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

अयोध्येतील राम मंदिर अभिषेक सोहळ्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी मीरारोड येथे जातीय हिंसाचार सहभागी असलेल्या14 आरोपींना अटक केली त्यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे.तपास पूर्ण झाला असून आरोपींना तुरुंगात ठेवणे चुकीचे असेल असे न्यायालयाने म्हटले आहे.  

अयोध्यातील राम मंदिर अभिषेक सोहळ्यापूर्वी संध्याकाळी इतर समाजातील 14 जणांना अटक केली होती. सोमवारी या प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की या वर्षी जानेवारीत राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यासाठी आलेल्या मिरवणुकीत सहभागी झालेल्या लोकांवर हल्ला करण्याचा कट पूर्वनियोजित होता असे प्रथमदर्शनी सांगता येत नाही.

कोणत्याही सीसीटीव्ही फुटेज मध्ये आरोपीं हल्ला करताना दिसत नाही. या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झालेला असून आरोपी जानेवारीपासून कोठडीत आहेत आणि खटला लवकर संपण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे त्याला आणखी कोठडीत ठेवणे अयोग्य ठरणार आहे. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या विविध तरतुदींनुसार आरोप आहेत.मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी आपल्या आदेशात म्हटले आहे की, आरोपी बेकायदेशीर संमेलनात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी दाखवण्यासाठी पुरेसे पुरावे असणे आवश्यक आहे. कथित ठिकाणी ताफ्याचा प्रवेश हा योगायोग होता आणि त्यामुळे रॅलीच्या सदस्यांवर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता, असे म्हणता येणार नाही, असेही खंडपीठाने म्हटले आहे.
Edited By - Priya Dixit