शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 28 एप्रिल 2022 (21:22 IST)

भीषण अपघातात दोघे जागीच ठार

लोणी काळभोर टोलनाक्यावर 2 कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. आज पहाजे 3 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पुण्याहून यवतकडे जाणार्‍या तसेच यवतच्या  दिशेने पुण्याकडे येणार्‍या 2 गाड्यांमध्ये जोरदार टक्कर  झाली. यवतकडे  जाणारी गाडी  भरधाव  वेगात  होती. गाडीवरील  नियंत्रण  सुटून  विरुद्ध दिशेने येणार्‍या गाडीला जोरदार धडकली आहे. हा अपघात  इतका  भीषण होता की दोन्ही गाड्यांचा जागेवरच चुराडा  झाला आहे. या अपघातात एका गाडीचा चालक आणि एका रस्त्यावरून जाणार्‍या व्यक्तीचा जागीच मृत्यू  झाला  आहे. तसेच दुसर्‍या कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.