गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 20 जुलै 2021 (09:49 IST)

मुख्यमंत्र्यांचे विठुरायाला साकडे

पंढरपुरात आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल आणि रुक्मिणीची विधिवत शासकीय पूजा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आली. ठाकरे यांनी ही पूजा आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या समवेत केली.या वेळी त्यांनी पंढरपुरात भक्तिसागर भरू दे,टाळ-मृदंगाच्या गजरात तुझी वारी पुन्हा सुरु होऊ दे .कोरोनाचे संकट आता नाहीसे होऊ दे,महाराष्ट्रात आरोग्यात आणि संपन्नता नांदू दे.असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठुरायाला घातले.या वेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. 
काल दुपारचाच्या सुमारास मुख्यमंत्री आपल्या कुटुंबियांसमवेत पंढरपूरला कार ने विठ्ठलाच्या महापूजेसाठी निघाले होते.