सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :मुंबई , शुक्रवार, 14 जुलै 2023 (09:53 IST)

महायुतीत समन्वयासाठी समिती !

prasad lad
Committee for coordination in the grand alliance शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारमध्ये समन्वय राखण्यासाठी आता तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे समन्वयक भाजपचे आमदार प्रसाद लाड असणार आहेत.
 
राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्षांचे सरकार सत्तेवर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमध्ये येताच शिंदे गटाच्या आमदारांची नाराजी उघड झाली आहे. त्यामुळे सरकारमधीलच तीन पक्षांमध्ये रोष निर्माण होऊ नये. सरकारला त्याचा फटका बसू नये यासाठी आणि तिन्ही पक्षांमध्ये समन्वय रहावा म्हणून एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात तिन्ही पक्षांतील प्रत्येकी चार सदस्यांचा समावेश आहे. या सदस्यांत समन्वय साधण्याचे काम भाजप नेते आमदार प्रसाद लाड करणार आहेत. त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटातील आमदारांशी देखील असलेले चांगले सबंध पहाता त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
 
या समितीत भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड आणि आशिष शेलार यांचा समावेश आहे. शिवसेनेकडून उदय सामंत, शंभूराज देसाई, दादा भुसे व राहुल शेवाळे तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे – पाटील व धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.