गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 डिसेंबर 2021 (13:29 IST)

बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली असून या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदीविषयी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे.
 
यावर अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया देत सुप्रीम कोर्टाचे आभार मानले. त्यांनी म्हटले की बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असून महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे. त्यांनी दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना धन्यवाद देत सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन केले. त्यांनी म्हटले की हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट सरकारच्या नियमावलीनुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे.