शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 24 डिसेंबर 2023 (16:08 IST)

बार्टी सारथी स्पर्धा परीक्षेत गोंधळ! 2023 च्या परीक्षेला 2019 चा पेपर दिला

exam
राज्यात स्पर्धा परीक्षेत गोंधळ कमी होण्याचे नाव घेत नाही. आता संभाजी नगर येथे राज्य सरकार कडून सारथी, बार्टी आणि महाज्योती फेलोशिप साठी परीक्षा घेतल्या जात आहे. आज होणाऱ्या परीक्षेसाठी 2023 चे हे दिलेलं प्रश्नपत्र 2019 च्या प्रश्नपत्रिकेची हूबेहू कॉपी असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. 
 
विद्यार्थ्यांचा आरोप आहे की आज 2023 ची प्रश्नपत्रिकेत 2019 ची सेट साठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील सर्वच प्रश्न तेच होते. प्रश्नच क्रमांक देखील एक सारखा होता. 
 
2019 मध्ये सेट साठी ही परीक्षा घेतली होती. तीच प्रश्नपत्रिका 2023 च्या फेलोशिपच्या परीक्षेसाठी वापरला गेला. आता विद्यार्थ्यांनी यावर आक्षेप घेतला आहे. 
 
Edited By- Priya DIxit