शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 28 मार्च 2022 (15:34 IST)

मुख्यमंत्र्यांविरोधात काँग्रेस नेता सर्वोच्च न्यायालयात

माजी मंत्री आणि काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
 
नसीम खान यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक चांदिवली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवली होती. त्यावेळी त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेना आमदार दिलीप लांडे अवघ्या 409 मतांनी विजयी झाले होते. दरम्यान, या निवडणुकीवेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीप लांडे यांचा प्रचार करताना आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप खान यांनी केला आहे. निवडणूक हरल्यानंतर खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली.
 
त्यानंतर आता खान यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता उद्धव ठाकरेंसह सहा जणांना नोटीस पाठवत सहा आठवडय़ांत उत्तर मागितले