रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 9 नोव्हेंबर 2017 (10:23 IST)

डी एस के यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

आर्थिक दिवाळखोरीत अडकलेले पुण्याचे बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती यांचा अटकपूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. याआधी मंगळवारपर्यंत डीएसकेंच्या अटकपू्र्व जामीनावर दोन्ही बाजूनं युक्तीवाद सुरु होता. त्यामुळे अगदी पाच मिनिटांच्या आत या जामीन अर्जावर निर्णय देण्यात आला. डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळल्यानं आता पोलिस काय कारवाई करतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, पुणे, मुंबई, कोल्हापुरातील अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकल्याने डीएसके अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात हजारो गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदवल्या आहेत.