रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मे 2020 (21:59 IST)

पोलिसांवर कोरोनाचा कहर, सुरक्षा देणारेच अडचणीत

राज्यात करोनाबाधितांची संख्या रोज वाढत  आहे. मात्र  त्यामध्ये  आता आणखी एक मोठी  चिंताजनक माहिती समोर आली आहे. करोनाविरुद्ध पहिल्या फळीत लढणाऱ्या पोलिसांना करोनाची मोठ्या संख्येनं लागण झाली आहे. आतापर्यंत राज्यातील  एक हजार एक पोलीस करोना पॉझिटिव्ह आढलून आले  आहेत. करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या एक हजार एक पोलिसांमध्ये सध्या उपचार सुरू असले 851 जण, उपचारानंतर बरे झालेले 142 जण तर आतापर्यंत मृत्यू झालेल्या आठ जणांचा समावेश आहे.
 
याशिवाय लॉकडाउनच्या काळात  बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याच्या 218 घटना घडल्या आहेत. अशाप्रकारच्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत 770 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.  महाराष्ट्र पोलीस विभागाकडून ही माहिती देण्यात आलेली आहे.