शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (17:08 IST)

राज्यावर चक्रीय वाऱ्याचं संकट; पिकांची विशेष योग्य ती काळजी घ्या

rain
सध्याच्या पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे.
त्यामुळे उत्तरेकडून येणारे वारे महाराष्ट्राच्या वायव्य भागात धडकत आहेत. त्यामुळे राज्याच्या वायव्य भागात थंडीचे प्रमाण वाढले आहे आता याच भागात चक्रीवादळाच वातावरण तयार झालं आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 8 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझप्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहेत.
तर हिमालयीन भागात हिमवृष्टी होईल असे हवामान खात्याने सांगितले. पश्चिमी वाऱ्यांच्या चक्रावातामुळे मागील काही दिवसांपासून हिमालयीन प्रदेशासह जम्मू काश्मीर आणि लगतच्या प्रदेशात अनेक ठिकाणी पावसासह हिमवृष्टी होत आहे.
त्यामुळे आता हवामान खात्यानं 8 फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालयीन प्रदेश, जम्मू- काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझप्फरबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, चक्रिय वाऱ्याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार असल्याचं हवामान खात्यानं सांगितलं आहे. त्यामुळे आता चिंतेत आणखी भर पडली आहे.
या सर्व बदलत्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नंदुरबार, म्हणजेच संपूर्ण खान्देश तसेच बुलढाणा,अमरावती नागपूर, नाशिक औरंगाबाद या जिल्ह्यात होईल. त्यामुळे तिथेही शेतकऱ्यांनी उभ्या, काढणी केलेल्या पिकांची विशेष योग्य ती काळजी घ्यावी.
8 फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा वायव्य भारतात पश्चिमी वाऱ्याच्या डिस्टर्बन्समुळे काही बदल होतील. त्यामुळे 9 आणि 10 फेब्रुवारीच्या कालावधीत नागपूरसह विदर्भात तापमानाचा पारा अचानक 2 ते 4 अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.
अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही खाली जाण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तान आणि अफगाणिस्तानात पुन्हा एकदा धुळीचे वादळ निर्माण झालं आहे. येत्या काही तासांत राजस्थान आणि गुजरातमध्येही याचा परिणाम जाणवणार आहे.