गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 जानेवारी 2019 (16:04 IST)

सिलिंडर स्फोटात ४ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बैल बाजार परिसरातील क्रांती नगरमध्ये चाळीत झालेल्या सिलिंडर स्फोटात एका ४ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. तसेच एक तरुण जखमी झाला.  सिलिंडरच्या स्फोटामुळे चाळीला आग लागली. मात्र, अग्निशमन दलाजवान घटनास्थळी पोचले आणि काही वेळातच त्यांनी ही आग आटोक्यात आणली. या सिलिंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्या अनुष्का चौरसिया या ४ वर्षाच्या चिमुकलीला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखल करण्याआधीच डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.