शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 ऑगस्ट 2023 (11:54 IST)

Accident News चिमुरडीसह आई-वडिलांचा मृत्यू

accident
Accident Newsचंद्रपूर जिल्ह्यात ट्रकने मोटरसायकलला दिलेल्या धडकेत (Accident News) एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की मोटारसाकलचे तुकडे झाले आहेत. त्यामुळे आई वडिलांचासह एका चिमुकलीचा जागीच जीव गेला आहे. या घटनेनंतर ग्रामस्थांनी आक्रमक होत आंदोलन करत पोलिसांना जाब विचारला आहे.
 
 पोलिसांनी (Chandrapur Police) या प्रकरणाची नोंद करत तपास सुरु केला आहे.चंद्रपूरच्या राजुरा शहराजवळील धोपटाळा येथे ही भीषण दुर्घटना घडली आहे. या अपघातात निलेश वैद्य (32 वर्ष) त्यांची पत्नी रुपाली वैद्य (26 वर्ष) आणि मुलगी मधू वैद्य (3 वर्ष) यांचा मृत्यू झालाय. धोपटाळा येथील गुरुदेव नगर येथे राहणारे निलेश वैद्य हे बल्लारपूर येथून घरी जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलीस अपघातस्थळी दाखल झाले होते. अपघातामध्ये वैद्य कुटंब जागीच संपलं आहे. अपघात एवढा भीषण होता की मृतदेह चिरडलेल्या अवस्थेत रस्त्यावरच पडले होते.
 
दरम्यान, या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून वेकोलीची कोळसा वाहतूक होत असल्याने या ठिकाणी अनेक अपघात यापूर्वीही झाले आहेत. मात्र प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे.