शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2021 (15:41 IST)

कोरोना लस, मोबाईलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती देवू नका - गृहमंत्री

राज्यात करोना लसीकरणाला सुरूवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात कोविड योद्ध्यांना लस दिली जाणार असून, टप्प्याटप्प्यानं सर्व नागरिकांपर्यंत लस पोहोचणार आहे. लसीकरणाला सुरूवात झाल्यानंतर फसवणुकीच्या आव्हानानं डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः लोकांना लसी नोदणींच्या भूलथापांना बळी न पडण्याचं आवाहन केलं आहे.
 
देशमुख म्हणतात की  “राज्यात करोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. ही मोहीम केंद्रीय यंत्रणेकडून जिल्हा यंत्रणेमार्फत राबविली जात आहे. काही सायबर हल्लेखोर नागरिकांना फोन करून या लसीची नोंदणी करण्यासाठी मोबाइलवर आलेला ओटीपी, आधार क्रमांक, पिन कोड व इतर वैयक्तिक माहिती विचारत आहेत,” अशी माहिती देशमुख यांनी दिली.पुढे ते सांगत आहेत की, “अशा प्रकारच्या भूलथापांना नागरिकांनी बळी पडू नये, तसेच आपली कोणतीही माहिती सामायिक करू नये, असे मी आवाहन करतो. तसेच या फोन कॉल्सची नजिकच्या पोलीस स्टेशन मध्ये आणि महाराष्ट्र सायबर विभागात तक्रार करावी. जेणेकरून पोलीस या सायबर हल्लेखोरांवर नियमांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करतील,” असं आव्हानही देशमुख यांनी केलं आहे.