वाढणाऱ्या तापमानामुळे ,राज्यावर पाणी टंचाईचे संकट
सध्या देशात उकाडा सुरु आहे. उष्णतेच्या लाटांमुळे नागरिक हैराण झाले असून सध्या उष्माघाताचा परिणाम देखील नागरिकांवर होत आहे. सातत्याने वाढणाऱ्या तापमानामुळे धरणातील पाण्यांवर देखील परिणाम पडला असून धरणातील पाणी आटत आहे. त्यामुळे आता राज्यात पाणी टंचाईला देखील सामोरी जावे लागणार आहे.
मुंबईत तापमान वाढले असून उकाड्याने नागरिक हैराण झाले आहे. मुंबईत ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ,बदलापूर आणि नवी मुंबईतील अनेक भागात पाणी टंचाईला सामोरी जावे लागत आहे. तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता वर्तवली असल्यामुळे मुंबईकरांना पाणी टंचाईला सामोरी जावे लागू शकते.
राज्यात एप्रिल महिना सर्वात उष्ण राहिला असून विक्रमी तापमानाची नोंद झाली. विदर्भ ,मराठवाडा आणि कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटा आल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे.शेतासाठी पाणी भरपूर लागते त्या मुळे पाणी टंचाई जाणवत आहे.