रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 10 एप्रिल 2023 (07:36 IST)

एकनाथ शिंदेंचं वागणं म्हणजे "मूह मे राम, बगल मे छुरी

chandrakant khaire
काही लोकांना हिंदुत्त्वाची एलर्जी आहे, म्हणूनच त्यांनी वडिलांना दिलेलं वचन मोडलं, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. आता, मुख्यमंत्री शिंदेंवर ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरेंनी पलटवार केला आहे.
 
उद्धव ठाकरे यांच्या पाठीत एकनाथ शिंदे यांनी खंजीर खुपसला. त्यामुळे, एकनाथ शिंदेंचं वागणं म्हणजे "मूह मे राम, बगल मे छुरी", असंच आहे. मी अनेक वेळेला आयोध्याला गेलो, मी कार सेवा केली. पण, शिंदे यांचे असं चाललंय जसं की, हेच राम भक्त आहेत, हेच धनुष्यबाण वाले आहेत, आम्ही कोणीच नाहीत. श्रीराम एक वचनी होते, परंतु एकनाथ शिंदे हे अनेक वचनी आहेत. जे उद्धव ठाकरे यांचे झाले नाही ते श्रीरामाचे काय होणार ''मुह मे राम बगल मे छुरी'', असं एकनाथ शिदेंचं वर्तन असल्याची घणाघाती टीका चंद्रकांत खैरे यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांनी अगोदर राम मंदिर नंतर सरकार अशी घोषणा केली होती, याची आठवणही खैरेंनी करुन दिली.
 
Edited by : Ratnadeep Ranshoor