रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 11 ऑगस्ट 2021 (16:00 IST)

अकरावी ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही -बच्चू कडू

अकरावी ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नसल्याची प्रतिक्रिया शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. गरज पडल्यास संख्या वाढवू मात्र एकही जण शिक्षणापासून वंचित राहणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय. तर शाळा मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या आहेत. त्यामुळे कारवाई होत नसल्यामुळे कारवाई होत नसल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.
 
बच्चू कडू म्हणाले, 'ऍडमिशनला कुठलीही अडचण येणार नाही.एकाही मुलाला ऍडमिशन मिळणार नाही असं होणार नाही. सीईटीचे शुल्क परत मिळेल, तो त्यांचा अधिकार आहे. आमचं प्रशासन सगळं हात मिळवलेले आहे, प्रशासन त्यांच्या बाजूने उभं राहतं. शाळां मोठ्या नेत्यांच्या, राजकीय नेत्यांच्या आहेत, म्हणून कारवाई होत नाही, त्यांना भीती वाटतेय. अधिकाऱ्यांची कार्यक्षमता संपलीय, त्यामुळे कायदा बद्दलविण्याचा विचार करतोय.'