मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (07:24 IST)

राज्यातली पहिलीच घटना, कोरोना परिस्थितीत दाखला हलगर्जीपणा, क्लास वन अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

कोरोना परिस्थितीत हलगर्जी दाखविल्या प्रकरणी राज्यातील पहिला गुन्हा नाशिकमध्ये एका क्लास वन अधिकाऱ्यावर दाखल झाला आहे. या प्रकरणात नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्या विरोधात पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत क्षेत्रिय स्तरावरील समन्वयासाठी शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, त्यांनी समन्वय साधण्यात दुर्लक्ष केल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे यांनी गुन्हा दाखल केला आहे. 
 
‘माझे कुटुंब माझी जबादारी’ या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच नाशिक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांची ऑनलाईन बैठक झाली होती. या बैठकीमध्ये सादर केलेल्या माहितीवरून हा सगळा गोंधळ समोर आला आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे यांनी दिलेली माहिती योग्य नव्हती हे वरिष्ठांच्या लक्षात आले. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत गंभीर विषयावर चुकीची माहिती दिल्याने वरिष्ठांनी त्याची दखल घेतली आहे. त्यामुळे हलगर्जीपणा केल्याचा ठपका रवींद्र शिंदे यांच्यावर ठेवण्यात आला.