बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 जुलै 2018 (09:08 IST)

शेतकऱ्याची शक्कल : दुचालीका केला नांगर

यवतमाळ येथील बोरी अरब गावाच्या एका शेतकऱ्याने शेतात डवरर्णी साठी बैलजोडी मिळत नसल्याने युक्ति वापरून दुचाकीच्या साह्याने डवरणी पूर्ण केली आहे त्याची आणि सर्वत्र चर्चा आहे.
 
शेतकरी सुभाष बांडे यांचे बोरी शिवारात ४ एकर शेती आहे शेतात सोयाबीन लागवड केली अशावेळी शेतात डवरणी करून शेतातील तण काढायचे होते अशावेळी डवरणी साठी बैलजोडी होती मात्र आजूबाजूला शेतीचे काम सुरू असल्याने बैलजोडी मिळत नव्हती ही बाब त्याने त्याचे मामा ला सांगितली शेतकऱ्याने त्याचे मामा किरण कावरे यांनी दुचाकीला डवरणीचे साहित्य बांधून डवरणी करून पाहण्याचा सल्ला दिला आणि त्या शेतकऱ्याचा प्रयत्न यशस्वी झाला.एक एकरात दोन लिटर पेट्रोल अशापद्धतीने त्या शेतकऱ्याला ८ लिटर पेट्रोल मध्ये दोन सहकारी मित्र सोबतीने त्यानां २०० याप्रमाणे रोज दिला आणि कमी वेळात डवरणी केली. या डवरणी साठी या शेतकऱ्याने दुचाकीचे समोरील चाकावरील कव्हर काढले जेणे करून त्याला माती लागू नये  तसेच एक मोठी लाकडी काठी दुचाकीच्या समोरील चाकाच्या थोड्या वर बांधली आणि त्याच काडीवर दोन साईड ला दोन डवरे बांधेल आणि ते डवरे सांभाळण्यासाठी दोन मित्र दुचाकीच्या काही फूट अंतरावर मागे ठेवले आणि डवरणी केली आणि आज त्या शेतकऱ्याचे डवरणी यशस्वी झाल्यानंतर त्याचे मामा कावरे यांनी आता त्यांच्या शेतात डवरणी करण्यास सांगितले आहे आज त्याची दुचाकी आणि डवरणी कशापद्धतीने करतो हे पाहण्यासाठी लोक गर्दी करतात. डवरणीसाठी बैलजोडी मिळत नाही या अडचणी वर या शेतकऱ्याने युक्ती करून अडचणींवर मात केली आहे.