शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 29 डिसेंबर 2021 (12:10 IST)

वैवाहिक त्रासाला कंटाळून आईने बाळासमोरच मरण पत्कारले

नागपुरच्या संजय नगर परिसरात एका महिलेने वैवाहिक त्रासाला कंटाळून आपल्या चिमुकल्याच्या समोरच गळफास लावून आपले आयुष्य संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मेघा सुरज कांबळे असे या मयत महिलेचे नाव आहे. ही  घटना सोमवारी दुपारी घडली आहे. घरात कुणीही नसताना तिने हे टोकाचे पाऊल  घेतले.  
मिळालेल्या माहितीनुसार मयत मेघा हिचे लग्न सहा वर्षांपूर्वी गांधीनगर रहिवासी सुरज यांच्याशी झाला. सुरज एक पेंटर असून त्याला दारूचे व्यसन जडले आहे. हे त्यांचे प्रेम विवाह होते. त्यांनी हे लग्न घरातील सदस्यांच्या विरोधात जाऊन केले होते.  त्यांना तीन वर्षाचे अपत्य आहे. सुरज आणि मेघा यांच्यात सुरजच्या दारूच्या व्यसनाला घेऊन भांडण होत होते. या भांडणाला कंटाळून ती माहेरी निघून गेली. ती आपल्या वैवाहिक वादाला कंटाळली होती आणि तणावात होती. सोमवारी घरात ती आई तिचे लहान बाळ होते .आई कामानिमित्ते बाहेर गेली असता मेघाने पंख्याला ओढणी बांधून गळफास घेऊन आपले आयुष्य संपविले. तिचे बाळ रडू लागल्याने तिची आई ने घरात येऊन बघितले तर मेघा ने गळफास घेतला होता. तिच्या आईने आरडा ओरडा करून सर्वाना एकत्र केले. शेजारच्यांनी मेघाला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.  पोलिसांना घटनेची माहिती दिल्यावर त्यांनी घटनास्थळी येऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून तपास करत आहे.