पोलिसात तक्रारी नोंदवा आता व्हॉटसॲपवर
नाशिक शहर पोलिसांनी गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी व्हॉटसअप क्रमांक जाहीर केला आहे.त्यामुळे आता नागरिकांना पोलिस आयुक्तालयांच्या 8263998062 या व्हॉटसॲप क्रमांकावर अपघात, वाहतूक कोंडी, गुन्हा, अवैध धंदे, टवाळखोर या सगळ्याची माहिती देता येणार आहे.
विशेष म्हणजे माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले असल्याने नागरिकांना बिनधास्त माहिती देता येणार आहे.
शहर पोलिसांनी त्वरित कार्यवाहीसाठी सोशल मीडियाची मदत घेण्याचा निर्णय घेताना व्हॉटसअप क्रमांक जाहीर केला आहे. त्यानुसार नागरिकांना पोलिसांनी त्वरित माहिती कळविण्याचे आवाहन केले आहे.
पोलिसांनी जाहीर केलेल्या व्हॉटसॲप ग्रुपवर गुन्हे, गुन्हेगार, अवैध धंदे, अपघात, वाहतूक कोंडी, टवाळखोरांचा उच्छाद आणि इतर नागरिकांच्या तक्रारीसाठी हा क्रमांकावर माहिती देता येणार आहे.
शुक्रवार (ता. १८) पासून हा नवीन व्हॉटसॲप क्रमांक सुरू करण्यात आला असून यावर नागरिकांकडून दिली जाणारी माहिती पोलिसांकडून तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणार आहे.