गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जून 2019 (16:26 IST)

बेलखंडी मठ जमिन प्रकरण : धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा

सरकारी जमीन हडप केल्याप्रकरणी विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. बेलखंडी येथील मठाला इनाम दिलेली सरकारी जमीन धनंजय मुंडे यांनी पदाचा गैरवापर करून त्यांच्या जगमित्र साखर कारखान्यासाठी विकत घेतली. कृषी जमीनही अकृषिक केली, असा ठपका धनंजय मुंडेंवर ठेवण्यात आला आहे. तपासी अंमलदारावरही देखील औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. याप्रकरणी पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. राजाभाऊ फड यांनी याप्रकरणी याचिका दाखल केली होती.
 
धनंजय मुंडे यांनी १९९१ साली जगमित्र शुगर फॅक्टरीसाठी २४ एकर जमीन खरेदी केली होती. या खरेदी व्यवहाराविरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात राजाभाऊ फड (रत्नाकर गुटे यांचे जावई) यांनी तक्रार दिली होती. ही जमीन अंबाजोगाई तालुक्यातील पूस येथील बेलखंडी देवस्थानची आहे.
 
गिरी, देशमुख व चव्हाण यांच्यात जमिनीवरून वाद होता. जमिनीच्या विक्रीचे अधिकारी  देशमुख व चव्हाण यांना मिळाले होते. त्यांच्याकडून मुंडे यांनी ही जमीन खरेदी केली होती. पोलिस ठाण्यात तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून फड यांनी औरंगाबाद खंडपीठात फौजदारी याचिका दाखल केली होती. ही सरकारी जमीन आहे. त्यामुळे ती ट्रस्ट्र किंवा खासगी व्यक्तीला विकत घेता येत नाही, असा आक्षेप फड यांनी घेतला होता.