शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 17 मे 2022 (08:29 IST)

सांगली जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज; दोघांवर गुन्हा

crime news
बोगस व्यक्ती उभा करून जिल्हा न्यायालयात बनावट दस्तऐवज केल्याप्रकरणी इम्तियाज कोपळ व अल्ताफ खान (दोघे रा. हुबळी,जि. बेळगाव ) यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत मोहित धीरजकांत गुप्ता ( रा. शेवाळे गल्ली, खणभाग, सांगली) यांनी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित अल्ताप खान यास क्रशिंग मशीन घ्यायचे होते. यासाठी तो इम्तियाज कोपळ याला घेऊन विजयनगर येथील जिल्हा न्यायालयात आला होता. दोघांनी त्यांचे वकील सय्यद फकरुद्दीन यांना खोटी माहिती दिली.
 
फिर्यादी मोहित गुप्ता यांचे नाव सांगून संबंधित व्यक्ती हीच असल्याचे सांगितले, पण गुप्ता यांच्या जागी प्रत्यक्षात दुसरीच व्यक्ती उभा केली. गुप्ता यांच्या नावावर नोटरी तयार करून खोटा दस्तऐवज केला. त्यावर गुप्ता यांची बनावट सही पण केली. हा सारा प्रकार शनिवारी सकाळी दहा वाजता घडला. त्यांची ही बनावटगिरी कागदपत्रांची तपासणी करताना उघडकीस आली.