शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 जानेवारी 2021 (22:07 IST)

मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे  तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्ते बाबतची माहिती लपवल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर मुंडे यांच्यावर पक्षाने कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी केली आहे.
 
भाजप नेते किरीट सोमय्यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात राज्य निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून तक्रार केली आहे. या तक्रारीत धनंजय मुंडे यांनी २०१९च्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात दुसरी पत्नी, अपत्य आणि मालमत्ते बाबतची माहिती लपवल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.