रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 डिसेंबर 2020 (08:22 IST)

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी

दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. दरम्यान, जाधव यांनी आपल्यावर दाखल झालेला गुन्हा आणि अटक राजकीय हेतूने प्रेरीत असल्याचे म्हटले आहे. आपण आपली सहकारी इशा झा हिच्यासोबत पुण्यातील बावधन भागातील एका दुकानात गेलो असता फार्यादीने दोघांचे अपहरण करुन मारहाण केल्याचे हर्षवर्धन जाधव यांचं म्हणणे. 
 
पोलीस आपली तक्रारच घेत नसल्याची तक्रार हर्षवर्धन जाधव यांच्याकडून न्यायालयासमोर करण्यात आली. मारहाणीची ही घटना सोमवारी घडलेली असताना गुन्हा मंगळवारी संध्याकाळी दाखल झाला आणि त्यामागे राजकीय हात असल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. दरम्यान, सासरे रावसाहेब दानवे यांनी आपल्याला या प्रकरणात अडकवल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.