मंगळवार, 28 मार्च 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated: बुधवार, 28 एप्रिल 2021 (10:03 IST)

ठाण्यातील खासगी रुग्णालयात भीषण आग लागून चार रूग्णांचा मृत्यू

कोरोनामधीलदुसर्‍या हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील ठाण्यातील खासगी रुग्णालयात बुधवारी पहाटे आग लागली आणि कोरोनाचे किमान चार रुग्ण ठार झाले. ठाण्यातील मुंब्रा येथील प्राइम क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये पहाटे 3.40वाजता ही आग लागली.
 
आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तीन फायर इंजिने आणि पाच रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आणि अधिकाधिक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. जेव्हा आग लागली तेव्हा तेथे 26 रूग्ण रूग्णालयात दाखल होते. परंतु त्यातील 22 जणांना तेथून सुरक्षित काढण्यात आले. त्याचवेळी दुसर्‍या रूग्णालयात हालवताना चार जणांचा मृत्यू झाला.